पदावली व अक्षरांचा वापर | Expression and the use of letters in place of numbers

पदावली व अक्षरांचा वापर | Expression and the use of letters in place of numbers 

पदावली व अक्षरांचा वापर | Expression and the use of letters in place of numbers

पदावली व अक्षरांचा वापर

 ■ गणिती क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार एकत्रितपणे पदावलीमध्ये दिलेल्या असतात.

■ दोनपेक्षा अधिक क्रिया एखादया उदाहरणात असल्यास खालील पद्धतीने त्या कराव्यात त्याचा 

 क्रम असा असावा :  कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी

दिलेल्या उदाहरणात कंस दिला असेल तर त्या कंसातील रित प्रथम करावी.  त्यानंतर डावीकडून प्रथम 

गुणाकार किंवा भागाकार असेल तर प्रथम करावा.

शेवटी डावीकडून बेरीज / वजाबाकी करावी. 

----------------------------------------------------

 ■ नमुना उदा. 

 35 ÷ 7 + 4 - ( 2 x 3 ) प्रथम कंस सोडवावा.

25÷ 5 + 4 - 6    भागाकार

= 5 + 4 - 6    बेरीज

= 9 - 6  वजाबाकी

= 3

----------------------------------------------------

 ■ अक्षराचा वापर :  गणितामध्ये कोणत्याही संख्येसाठी अक्षराचा वापर करून गुणधर्म सांगता येतात. 

                             उदा. a x 0 = 0

■ याचाच अर्थ : कोणत्याही संख्येस शून्याने गुणले असता गुणाकार शून्य येतो

■ जेव्हा दोन पदावल्यांची किंमत समान नसते, तेव्हा त्या दोन पदावल्यांमध्ये असमानता आहे असे म्हणतात.

■ कोणत्याही दोन संख्यांवर या क्रिया केल्या असता येणारे उत्तर ही सुद्धा एक संख्याच असते.

■ नमुना प्रश्न

1)     7÷ 7 + 7 x 7 - 7  चे सोपे रूप कोणते?

        1)  1    2) 43   3)  41  4)  49

 स्पष्टीकरण : पदावली सोडवण्यासाठी ' कचेभागुबेव ' या क्रमाचा उपयोग करू.

     ( 7÷ 7 )+ (7 x 7 )- 7 = 1 + 49 - 7 = 43 हे उत्तर मिळते

पर्याय क्र. 2   हे अचूक उत्तर आहे.

 ----------------------------------------------------

 2)   K = 5 व M =3 असेल तर, 5 x K + M = किती ?

      1) 20    2) 13   3)  28   4)  40

 स्पष्टीकरण :  अक्षराची किंमत घालून पदावली सोडवावी.

5 x K + M = किती ?

= 5 x(5) + 3 = 

= 25 + 3 = 28

पर्याय क्र.  3  हे  अचूक उत्तर आहे.

Post a Comment

To be published, comments must be reviewed by the administrator *

أحدث أقدم
Post ADS 1
Post ADS 1