वर्तुळ | Circle
वर्तुळ
■ उपघटक - त्रिज्या, व्यास, जीवा, केंद्र, परीघ, आंतरभाग, बाहयभाग, वर्तुळकंस
■ त्रिज्या - वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या होय.
एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात.
■ जीवा- वर्तुहावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा होय
■ व्यास - वर्तुळ केंद्रातून जाणा-या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात.
व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते.
वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो.
■ वर्तुळाचा आंतरभाग - वर्तुळाच्या आत असलेल्या भागाला वर्तुळाचा आंतरभाग म्हणतात.
■ वर्तुळाचा बाहयभाग - वर्तुळाच्या बाहेर असलेल्या भागाला वर्तुळाचा बाहयभाग म्हणतात.
■ वर्तुळाचा परीघ - वर्तुळाच्या वर्तुळाकार लांबीला परीघ म्हणतात.
■ वर्तुळ कंस - वर्तुळ परीघाच्या लहान मोठया भागांना वर्तुळकंस म्हणतात.
वर्तुळ कंसाला तीन अक्षरी नाव देतात
O - वर्तुळ केंद्र
OP - त्रिज्या
QP - जीवा
RP - व्यास
RQP - वर्तुळ कंस
S,T - वर्तुळाच्या आंतरभागातील बिंदू
M,N - वर्तुळाच्या बाहयभागातील बिंदू
إرسال تعليق